www.jaiindiajaibharat.com

www.jaiindiajaibharat.com
www.jaiindiajaibharat.com

Live TV

Wednesday, September 28, 2022

तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री श्री चंद्रशेखर राव यांनी, महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीत कामकरणाऱ्या, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

         

     हैदराबाद : महाराष्ट्रातील शेतकरी चळवळी मधे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री श्री चंद्रशेखर राव यांनी निमंत्रित करत तेलंगणा राज्याची कृषि व इतर क्षेत्रात मागील सात वर्षात झालेली प्रगती बद्दल माहिती दिली व राज्यात प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी आग्रही केले.

             या वेळी जेष्ठ शेतकरी नेते श्री दशरथ सावंत , श्री माणिक कदम , ऍड योगेश पांडे व इतर शेतकरी उपस्थित होते. या बद्दल माहिती देतांना श्री माणिक कदम यांनी सांगितले की तेलंगाणा राज्यात गेल्या ४ वर्षात एकही शेतकरी आत्महत्या झालेली नाही. या राज्यात शेतकऱ्यांना सलग मोफत वीज उपलब्ध करून दिली जाते , दर वर्षी प्रत्येक शेतकऱ्यांना दहा हजार रुपये प्रति एकर रक्कम विमा संरक्षण पोटी थेट दिली जाते.

            राज्यात कृष्णा व गोदावरी नदीचा नदी जोड प्रकल्प यशस्वी केला आहे , तसेच शेतकऱ्याचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना पाच लाख रुपये मदत राज्य सरकार देते. इतर अनेक विविध योजना राज्यात राबविल्या जात असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री महोदयांना आम्हाला दिल्याचे श्री कदम यांनी सांगितले. तेलंगणा मॉडेल बद्दल दोन दिवस सलग मा.मुख्यमंत्री यांनी पूर्ण वेळ देत आस्थेने चर्चा केली. 

          महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांच्या दररोज होत असलेल्या आत्महत्या बद्दल तीव्र दुःख व्यक्त करत त्यांनी या बद्दल ठोस भूमिका घेण्याचे आवाहन केले. या पुढे देशात एकही शेतकरी आत्महत्या झाली नाही पाहिजे असे धोरण ठेवून काम करावे लागेल असे त्यांनी सांगितले. अशी माहिती शेतकरी नेते 
श्री माणिकदादा कदम यांनी कळविले आहे...





No comments:

Post a Comment

JAI INDIA JAI BHARAT T.V. LIVE....

तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री श्री चंद्रशेखर राव यांनी, महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीत कामकरणाऱ्या, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

               हैदराबाद : महाराष्ट्रातील शेतकरी चळवळी मधे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री श्री चंद्रशेखर राव यांनी...

DEPARTMENTS

Girl in a jacket