www.jaiindiajaibharat.com/news channel
कामगारांवर आमरण उपोषणाची वेळ
औरंगाबाद कोवीड योद्धावर,आमरण उपोषणाची वेळ,घाटी प्रशासनाचा गलथान कारभार....
औरंगाबाद दि 6 जुलै; शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय औरंगाबाद येथील 150 कोविड योद्धे, कथित कंञाटी कामगारांना, घाटीच्या अधिष्ठाता डाॅ कानन येळीकर यांनी दिलेले, आश्वासन पूर्ण न केल्याने, या कामगारांवर आमरण उपोषणाची वेळ आली आहे. सेवेत कायम करण्याच्या, मागणीसाठी हे आमरण उपोषण करण्यात येत आहे.
याबाबत मा. अमितजी देशमुख,वैद्यकीय शिक्षण मंत्री, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई, मा. सचिव,वैद्यकीय शिक्षण, अन्न व द्रव्य मंत्रालय, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई,मा. संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मंत्रालय, मुंबई, मा. जिल्हाधिकारी औरंगाबाद, मा. अधिष्ठाता,शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद यांना निवेदन देऊन कळविण्यात आले आहे. जास्तीत जास्त 10-12 वर्ष व कमित कमी गेल्या वर्ष 2 वर्षापासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालय, औरंगाबाद येथे सलग अखंडपणे कायमस्वरुपी प्रकारचे काम कथित कंत्राटी पद्धतीने करीत आहेत.
रु. 242/- रोजाच्या तोकड्या पगारावर हे 150 कोविड योद्धे इमानेइतबारे काम करीत आहेत. जानेवारी-फेब्रुवारी 2020 चा पगार जानेवारी 2021 मध्ये वैद्यकीय शिक्षण मंञी अमित देशमुख यांनी निधी दिल्याने मिळाला.या कामगारांनी कोरोना काळात सुरुवातीला पी. पी. ई. कीट, एन-95 मास्क इ. शिवाय रुग्णसेवा केली.नियमितपणे पगारही वेळेवर मिळत नव्हता, ओळखपत्रही नव्हते. पोलीसांचा मार खात अनेकजण ड्यूटीवर पोहचायचे. सिटीबस बंद, रिक्षा बंद होत्या, मोटारसायकलही नव्हती, पायी-पायी ड्युटीवर वेळेवर पोहोचायचे.
अक्षरक्षः रुग्णांचे डायपरही बदलले, पडेल ती कामे केली. अशा या कोविड योध्यांना त्यांच्या सेवेचे बक्षिस म्हणून सेवेत कायम करावे अशी अपेक्षा आपल्या संवेदनशिल सरकारकडून आहे. सरकारने इतर विभागातील कथित कंत्राटी कामगारांना कायम केले आहे, तोच न्याय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालय औरंगाबादच्या या 150 कथित कंत्राटी कोविड योध्यांनाही द्यावा. असे निवेदनात म्हटले आहे.
त्यांनी काम सांभाळून, ड्यूटी करून त्यांच्या मागण्यांसाठी रुग्णसेवा खंडित न करता 148 दिवस साखळी उपोषण केले होते. जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी आश्वासन दिल्यामुळे हे उपोषण मागे घेण्यात आले होते.
जिल्हाधिकारी औरंगाबाद यांना दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी गेलो असता त्यांची भाषा बदलली. त्याच बरोबर मा. अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांनीही आश्वासीत केलेले शासनाकडे कथित कंत्राटी कामगारांनी कोविड काळात केलेल्या कामाची दखल घेऊन शिफारस करण्याचे पत्रही अद्याप पाठविलेले नाही,
इमाने इतबारे सेवा करणार्या कामगारांविरोधात खोट्या तक्रारी घेऊन भांडणं लावणार्या सुपरवायझर बदलण्याचे आश्वासनही अधिष्ठाता यांनी दिले होते, उपोषण मागे घेत असताना त्यांनी दिलेली आश्वासने पाळलेली नाहीत. असा उल्लेख निवेदनात आहे. राज्य सेक्रेटरी कॉ. अभय टाकसाळ, माध्यमांशी बोलताना पुढे म्हणालेत....
डॉ. सुरेश हरबडे, अधिक्षक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद हे कामगार विरोधी मनोवृत्तीचे असुन गेल्या दिड वर्षात (कोविडकाळात) कामगारांबद्दल कुठल्याही तक्रारी नसताना आता कायम करण्याची मागणी केल्यामुळे मुद्दामहून हेतूपुरस्सर, कलुषीत बुद्धीने काही कामगारांबद्दलच्या वैयक्तीक तक्रारी घेऊन त्यांचे रेकॉर्ड खराब करण्याचे षडयंत्रात सहभागी झाले आहेत, ही बाब त्यांच्या निदर्शनास आणुन दिल्यानंतर ‘तुम्ही माझी तक्रार करा, माझ्यावर कारवाई करा’ अशी भाषादेखील ते वापरत आहेत.
त्यामुळे इमाने इतबारे काम करण्याच्या या कामगारांचा रोषही डॉ. सुरेश हरबडे यांच्यावर आहे, जानेवारी-फेब्रुवारी 2020 च्या थकित पगारासाठी मा. अमितजी देशमुख, वैद्यकीय शिक्षण मंत्री महाराष्ट्र शासन यांच्या आदेशाने पाठवलेला 60 लाख रुपयांचा निधी 4 ते 5 महिने दडवून ठेवला, या कामगारांना अद्यापही कोविड लस देण्यात आलेली नाही, म्हणून नंदाबाई हिवराळे,संगिताबाई शिरसाठ, मनिषाबाई हिवराळे, निता भालेराव हे कामगार शारिरीक आंतर पाळून, मास्क लावून आमरण उपोषणाला बसले आहेत.
टाळ्या आणि थाळ्या वाजवणे, हेलीकॅफ्टरमधुन पुष्पवृष्टी करणे आणि कष्ट करण्याची संधी
मागणार्या कोविड योध्द्यांना उपोषण करायला मजबुर करणे, हे अत्यंत लाजीरवाणे आहे असेही निवेदनात म्हटले आहे. महाराष्ट्र कामगार कर्मचारी युनियन संलग्न आयटक तर्फे कोविड विरोधात यशस्वी मुकाबला करणार्या 150 कोविड योध्यांना प्राधान्याने विशेष बाब म्हणून सेवेत सामावून घ्यावे व उर्वरित जागांसाठी खूली भरती करावी,
अशी नम्र विनंती करण्यात आली आहे. या निवेदनावर राज्य सेक्रेटरी कॉ. अभय टाकसाळ,
विकास गायकवाड, रतन अंबिलवाद, भालचंद्र चौधरी,
महेंद्र मिसाळ, किरणराज पंडित यांच्या सहया आहेत....असे वृत्त आमचे प्रतिनिधी जयइंडिया जयभारत यांनी कळविले आहे.www.jaiindiajaibharat.com/news channel