Monday, January 27, 2020
चितेंगांव पैठण येथे,ध्वजारोहण
केंद्रीय प्राथमिक शाळा चितेंगांव पैठण येथे, शालेय समिती अध्यक्ष संजय गायकवाड, यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शालेय समिती सदस्य व सर्व शिक्षक तसेच विद्यार्थी उपस्थित होते.ग्रामपंचायत चितेंगाव या पैठण येथे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ माया कडुबाळ नरवडे यांच्या हस्ते धवजारोहण करण्यात आले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य व तसेच ग्रामविस्तर अधिकारी उपस्थित होते.असे वृत्त जय इंडिया जय भारत प्रतिनिधी संजय त्रिभुवन यांनी कळविले आहे.
Sunday, January 26, 2020
महाराष्ट्र मराठी प्राथमिक शाळा वाळूज जिल्हा औरंगाबाद येथे, प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला
महाराष्ट्र मराठी प्राथमिक शाळा वाळूज येथे , संस्थेचे अध्यक्ष श्री नबी पटेल साहेब यांच्या अध्यक्षतेखाली प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष श्री नबी पटेल साहेब [अल्पसंख्याक मोर्चा जिल्हाध्यक्ष भा.ज.पा औरंगाबाद ]यांची उपस्थिती होती .तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती. ज्योतिताई गायकवाड मॅडम [ सभापती प.स. गंगापूर ] श्री. अविनाशजी गायकवाड साहेब [ सामाजिक कार्यकर्ता ]श्री.नंदकुमार राऊत साहेब [ ग्रा.प.सदस्य वाळूज ] श्री. पठाण साहेब, श्री.ईफत भाई इनामदार हे लाभले .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नबी पटेल साहेब यांनी प्रजासत्ताक दिना विषयी माहिती दिली. श्रीमती ज्योतिताई गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेत संविधांनांचे प्रतिज्ञा घेऊन विविध संस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले.
सोयगांव तालुक्यातील . सावळदबारा येथे प्रजासत्ताक दिन....
26 जानेवारी 2020 जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा सावळदबारा, या ठिकाणी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात, साजरा करण्यात आला. सुरुवातीला सकाळी गावातून प्रभात फेरी, काढण्यात आली. देशभक्तीपर जोरदार घोषणा दिल्या.या प्रसंगी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष जब्बार तडवी यांनी ध्वजारोहण केले. या ध्वजारोहण कार्यक्रमासाठी गावातील प्रतिष्ठित नागरिक, गावातील पञकार संघटनेचे पदाधिकारी व सर्व सदस्य, जि.प.कें.प्रा. शाळा सावळदबारा येथील शा.व्य. समिती अध्यक्ष व सर्व सदस्य , सावळदबारा ग्रां.प., ग्रामपंचायत सदस्य, प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैदकिय अधिकारी व कर्मचारी , पोलिस चौकीतील पोलिस कर्मचारी , पोलिस पाटील ,अंगणवाडी सेविका, आशा सेविका, पालक वर्ग , जि.प.कें.प्रा.शा. सावळदबारा येथील मुख्याध्यापक , सर्व शिक्षक विद्यार्थी व शिवाजी विद्यालय सावळदबारा येथील मुख्याध्यापक , सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. या प्रसंगी श्री ढोणे सर यांनी प्रजासत्ताक दिन विषयी माहिती सांगून, संविधानाच्या उदेशिकेचे वाचन घेतले. श्री बी.जी.गायकवाड सर यांनी सुञ संचलन केले. श्री गवई सर यांनी उपस्थितांचे आभार मानले . या कार्यक्रमासाठी श्रीमती हिरास मॅडम व सरकटे मॅडम यांनी परिश्रम घेतले. मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली... असे वृत्त जय इंडिया जय भारत प्रतिनिधी जब्बार तडवी यांनी कळविले आहे...
प्रजासत्ताक दिन देशभर साजरा, जयइंडिया जयभारत न्यूज वर महाप्रसारण www.jaiindiajaibharat.com
ग्राम बिटाेडा भाेयर येथे, २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिन , उत्साहात साजरा...
वाशिम जिल्हयातील मंगरुळपीर, तालुक्यातील ग्राम बिटाेडा भाेयर येथे, जिल्हा परीषद उच्च प्राथमिक शाळेत २६ जानेवारी २०२० राेजी प्रजासत्ताक दिन , उत्साहात साजरा करण्यात आला, यावेळी शाळेतील शिक्षकांनी व उपस्थीत मान्यवरांनी, प्रजासत्ताक दीनाचे महत्व सांगीतले, प्रजासत्ताक दीनाच्या साेहळयास शिक्षक ,पालक तथा ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य तसेच कर्मचारी आणि गावकरी मंडळी यांनी उपस्थीती दर्शविली. असे वृत्त जय इंडिया जय भारत प्रतिनिधी संदीप कांबळे यांनी कळविले आहे www.jaiindiajaibharat.com
Subscribe to:
Posts (Atom)
JAI INDIA JAI BHARAT T.V. LIVE....
तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री श्री चंद्रशेखर राव यांनी, महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीत कामकरणाऱ्या, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
हैदराबाद : महाराष्ट्रातील शेतकरी चळवळी मधे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री श्री चंद्रशेखर राव यांनी...

DEPARTMENTS
- Desh (131)
- Headline (125)
- Maharashtra (116)
- Maharashtra Video (118)
- Video (119)

-
हैदराबाद : महाराष्ट्रातील शेतकरी चळवळी मधे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री श्री चंद्रशेखर राव यांनी...