विवेकानंद आश्रम संचलित व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, संलग्नित
विवेकानंद, कृषि महाविद्यालय,हिवरा बु. येथील
अंतिम वर्षाचे विद्यार्थ्यांनी, ग्रामीण कृषी कार्यनुभव, कार्यक्रमांतर्गत सावंगी, माळी येथे फवारणी कशी करावी, व कोणती काळजी घ्यायची, या संदर्भात प्रात्यक्षिक, आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रगतशील शेतकरी भगवान अवचार, सुनील काळे व इतर शेतकरी उपस्थित होते.
प्रशिक्षणार्थी
विद्यार्थी शुभम पोफळे, याने उपस्थितांना फवारणी कशी करावी, तण तणनाशक हाताळणी, साठवणूक व फवारणी करताना, शेतकर्यांनी काळजी
काशी घ्यायची, ते सांगितले तसेच पिकात फवारणी, करताना एकेरी नोझल, असलेला पंप वापरावा, नेहमी स्वच्छ पाणी वापरावे, गढुळ पाणी अथवा साचलेल्या पाण्यात, फवारणी करू
नये,
हातमोजे, मास्क, टोपी,
प्रान, पुर्ण पँट, गॉगल हे संरक्षण साहीत्य, वापरल्याशिवाय द्रावण तयार करू नये, किटकनाशक शरीराच्या कुठल्याही भागावर पडणार
नाही याची काळजी घ्यावी,
नाक, कान, डोळे व हात फवारणी, होत असलेल्या, औषधापासून संरक्षित राहतील, याची संपूर्ण काळजी घ्यावी, किटकनाशक यांच्या लेबलवरील सुचना समजून
घ्याव्यात,
गरजेनुसार व
गरजे इतकेच द्रावण तयार करावे, दाणेदार प्रकारची औषधे, तशीच वापरावीत, त्यांना पाण्यात विरघळू नये, स्प्रे पंपाची टाकी भरताना औषधे सांडणार नाही याची काळजी घ्यावी, फवारणी संपल्यावर आंघोळ करावी व कपडे स्वच्छ
धुवावे,
फवारणी करताना
खाणे,पिणे, धुम्रपान करणे,
तंबाखू खाणे आदी
प्रकार अजिबात करू नये,
शिफारस केलेल्या
तिव्रतेच्या औषधांचा वापर करावा, अतितीव्रतेची औषधे वापरले म्हणजे किडरोग नियंत्रणात होतो, असे नाही, किंबहुना
त्यायोगे पर्यावरण व पिकांच्या स्वास्थ्यावर परीणाम होवू शकतो.
इतर
प्रशिक्षणार्थी विद्यार्थी हर्षल मंडलिक यांनीही माहिती दिली . प्राचार्य.कालवे सर,कार्यानुभव कार्यक्रम अधिकारी, खोडके सर,जकाते सर, डॉ.भोंडे सर,यांच्या मार्गदर्शनाखाली,शेतकऱ्यांना माहिती दिली. असे वृत्त जयइंडिया जयभारत प्रतिनिधी राहुल गवई, यांनी कळविले आहे...
No comments:
Post a Comment