सिद्धार्थ
महाविद्यालयात वृक्षारोपण
औरंगाबाद :
येथील,
सिध्दार्थ
महाविद्यालयात जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रखमाजी जाधव यांच्या हस्ते
महाविद्यालयाच्या परिसरात विविध प्रकारची वृक्ष लागवड करण्यात आली. शहराच्या
पर्यावरण संरक्षणसाठी व पर्यावरण संतुलनासाठी आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांनी
भूमिका घेणे गरजेचे आहे.
डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे बहिशाल शिक्षण मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या
संयुक्त विद्यमाने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात जाधव बोलत होते, याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य, मुपटा शिक्षक संघटनेचे सचिव व माजी नगरसेवक
प्रा. सुनील मगरे होते,
महाविद्यालयाचे
प्राध्यापक डॉ. मिलिंद आठवले, प्रा.शिलवंत गोपणारायन,
प्रा. विनोद
अंभोरे,
राम जाधव, विशाल पठारे व कल्याण नलावडे यांची प्रमुख
उपस्थिती होती.
यावेळी प्रा. सुनील मगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना
सांगितले की,
भविष्यात
दुष्काळ परिस्थिती निर्माण होणार नाही, याकरिता आजच्या काळातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश केल्यावर एक झाड
जगविण्यासाठी व त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारली असता महाविद्यालयाच्या
परिसरासोबतच आजूबाजूला असलेल्या गावाला व आपल्या गावाला सुध्दा ग्रीन कॅम्पस
बनवावा,
अशी अपेक्षा
यावेळी प्रा. मगरे यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे मुख्य आयोजक डॉ.मिलिंद आठवले
यांनी प्रास्ताविक करताना म्हटले की, दुष्काळ नष्ट करण्यासाठी वृक्षारोपण करणे व त्यासाठी संपूर्ण वर्षभर वृक्ष
लागवड करावी व त्याचे महत्त्व सामाजात पोहोचविणे विद्यार्थ्यांचे कर्तव्य व जबाबदारी आहे,प्रा. शिलवंत गोपणारायन यांनी
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वृक्षारोपनाचे महत्व पटवून दिले, प्रा. विनोद अंभोरे यांनी मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण प्रधान
यांनी केले,
आभार गौतम चाटसे
यांनी मानले,
कार्यक्रम
यशस्वीतेसाठी अमरदीप हिवाराळे, अमोल भालेराव,
सुनील दाभाडे व
दीपक पाईकराव यांनी प्रयत्न केले. असे वृत्त जयइंडिया जयभारत प्रतिनिधी सागर झणके यांनी कळविले आहे
No comments:
Post a Comment