बुलढाणा
जिल्ह्यातील मेहकर, तालुक्यामधील मौजे देऊळगाव माळी, गावांमध्ये विश्वशांती बुद्ध
विहार
बहुउद्देशीय
स्मारक समिती,
बुद्ध टेकडी
देऊळगाव माळी यांच्यावतीने वर्षावास २०१९ विविध कार्यक्रम कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची
सुरुवात, बुद्धाला वंदन करून आणि त्रिशरण पंचशील ग्रहण करून करण्यात आली. यानंतर
बुद्ध विहाराच्या परिसरामध्ये गुरुपौर्णिमा आणि वर्षावास २०१९ अवचीत्त साधून अनेक
वृक्षांचे लागवड करण्यात आली. ते वृक्ष लावायचीच नाही? तर त्याचा संगोपनाचे काम ही सर्वांनी हाती घेतले आहे .गावातील गरीब मुले
जे शिकण्यासाठी इच्छुक आहेत .शहरांमध्ये जाऊ शकत नाही त्यांच्या अभ्यासासाठी राजगृह अभ्यासिका सुरू करण्यात आली. या
कार्यक्रमासाठी मोरे (भा.रि.प. महासंघ), किसन बळी (क्रांतिसूर्य तालीम संघ अध्यक्ष), भास्कर गवई ( सामाजिक कार्यकर्ते), गजेंद्र गवई, पत्रकार राजेश मगर,पत्रकार कैलास राऊत,डॉ. विशाल मगर ,प्रकाश डोंगरे( युवा कार्यकर्ते), रामदास हिवाळे, विजय गवई (ग्रा.प. सदस्य) विलास गवई, सदाशिव गवई,
गणेश गवई संदीप
गाभणे,
अरुण गवई, प्रेम सागर गवई ,गोपाल सरदार ,संतोष मोरे ,सोपान अवसरमोल ,निलेश गवई, सचिन इंगळे ,विशाल इंगळे,बाळू गवई, असे विविध
क्षेत्रातील विविध धर्मातील गावकरी, कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब
आंबेडकर लिखित "बुद्ध आणि त्यांचा धम्म" या ग्रंथाचे पठन रोज रात्री ८:00वाजता सर्व गावकरी श्रवण करतीलच असा अनुभव
विविध मान्यवरांनी सांगितला आहे. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागावी, यासाठी सर्वच मोठ्या कार्यकर्त्यांनी
पुस्तकाची ग्वाहीही दिली.
निसर्गाचा बिघडलेला
समतोल योग्य जागेवर राहण्यासाठी "झाडे लावा, झाडे जगवा अभियान", विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागावी यासाठी राजगृह अभ्यासिका ,आणि गुरु गुरुपौर्णिमेनिमित्त, ग्रंथाचे पठन
अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन, असे विविध कार्यक्रम करून एक सामाजिक बांधिलकी, जपण्याचे काम विश्वशांती बुद्ध विहार स्मारक समिती, बुद्ध टेकडी देऊळगाव माळी, यांच्या वतीने करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम गवई सर आणि
राहुल गवई यांनी केले.
असे वृत्त जयइंडिया जयभारतचे प्रतिनिधी राहुल गवई यांनी कळविले आहे...
No comments:
Post a Comment