
19 जुलै रोजी दुपारच्या सुमारास बुलडाणा जिल्ह्यातील अलमपूर येथील, शारजाबाई शालिग्राम भगत, वय 65 वर्ष यांच्या अंगावर,
विज पडून त्यांचा मृत्यु झाला. तर त्याच्या शेजारी असलेल्या कमलाबाई, शेषराव मोरे वय 55 वर्ष, तर नितुबाई जीतेंद्र
मोरे वय 35 वर्ष, ह्या जखमी झाल्या.
दुपारच्या सुमारास अचानकपणे, विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. तीनही महीला शेतामध्ये,शेतीची कामे निंदन
करत असतांना, पाऊसापासून बचाव करण्यासासाठी, शेताच्या बांधावरील लिंबाच्या झाडाखाली, असलेल्या छोट्याचा झोपडीचा त्यांनी
आसरा घेतला. ज्या लिंबाच्या झाडाखालील झोपडिचा त्यांनी आसरा घेतला तीच्यावरच काळाने घाला घातला,क्षर्णाधात विज कोसळून शारजाबाई भगत यांचा अंत झाला तर त्याच्या सोबतीला
असलेल्या दोन महिला जखमी झाल्या,जखमी झालेल्या दोनही महिलांना खामगाव येथील सामाण्य रुग्णालयात उपचार करुन घरी
आणण्यात आले आहे. असे वृत्त जयइंडिया जयभारत प्रतिनिधी सागर झणके यांनी कळविले आहे.
No comments:
Post a Comment