Monday, July 29, 2019
कडुबाई खरात, "भीमगीत" जयइंडिया जयभारत न्यूज चॅनल kadubai kharat on jai india jai bharat news
Friday, July 26, 2019
Thursday, July 25, 2019
गळफास घेवून आत्महत्या
परीक्षेमध्ये
आलेल्या अपयशाने खचून जाऊन, चिखली बुलडाणा, येथील अनुराधा अभियात्रीकी च्या
विद्यार्थ्याने, गळफास घेवून आत्महत्या, केल्याची घटना 22 जुलै रोजी घडली. वैभव दत्ता डहाळके, वय 21वर्ष लोनार तालुक्यातील, चोरपांगरा / विरपांगरा येथील
मुळचा रहिवासी असलेला, चिखली येथील अनुराधा, अभियात्रिका महाविद्यालय बी.ई. आय.टी शाखेच्या पहिल्या वर्षाला शिक्षण घेत होता. असे वृत्त जय इंडिया जय भारत प्रतिनिधी, सागर झनके यांनी कळविले आहे.
Wednesday, July 24, 2019
Friday, July 19, 2019
निवडणुक निर्णय अधिकाऱ्यावर, कारवाई करून स्वतःला विजयी, घोषित करण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी..
बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील, सुलतानपूर ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत, प्रतिस्पर्धी उम्मेदवारचं. 2017
ची जात वैधता, प्रमाणपत्राच्या पावतीवर, छाननीत आक्षेप नोंदवूनही, दखल न घेणाऱ्या, निवडणूक निर्णय
अधिकाऱ्यावर कारवाई करूण, सौ उज्वला प्रल्हाद मोरे यांना अपात्र घोषीत करून, स्वतःला
विजयी घोषित करण्याची मागणी, जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आणि तथा जिल्हाधिकारी
यांच्याकडे, ''सागर पनाड'' यांनी केली आहे.
लोणार
तालुक्यातील सुलतानपूर, ग्रामपंचायत ची वार्ड क्रमांक पाच मागासवर्गीय एका जागे
साठीची, पोटनिवडणुक 23 जुनला झाली. यावेळी पाच उमेदवारांनी, उमेदवारी अर्ज दाखल केले
होते. दरम्यान तिन अर्ज मागे, घेण्यात आले. छाननीच्या वेळी प्रतिस्पर्धी, उम्मेदवार उज्वला प्रल्हाद मोरे, यांनी आपल्या उमेदवारी, अर्जासोबत जिल्हा, जातप्रमानपत्र पडताळणी, समिती कडे दाखल केलेल्या, पाच सप्टेबर 2017 ची पावती क्रमांक
235319 लावली असून, निवडणुक आयोगाच्या नियमा प्रमाणे, अद्यावत जात प्रमाणपत्र, समीतीची प्रस्ताव दाखल, केल्याची पावती, कींवा समीतीचे पत्र, दाखल
नकेल्याने, छाननीच्या दिवशी लेखी हरकत, घेवून सौ. उज्वला प्रल्हाद मोरे, यांचा उमेदवारी अर्ज
रद्द करावा, अशी लेखी हरकत घेतली होती.
हरकत योग्य असतांना, देखील प्रतिस्पर्धीचे
पती सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी असल्याने, व गावातील सत्ताधारी, प्रस्तापीतांच्या दबावाखाली, निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी माझी हरकत अमान्य केली, तर जिल्हा जात प्रमाणपत्र
पडताळी, कार्यालयात जात प्रमाणपत्र, पडताळी विनियमन, नियम 2012 मधील नियम 17(2) नुसार विजय उमेदवाराच्याच, प्रस्तावाची
पडताळणी होते.
इतर प्रस्ताव खारीज करण्यात येतात असे पत्र, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी, कार्यालयातून प्राप्त असल्यामुळे, सन 2019 च्या पोटनिवडणुकीत, सौ उज्वला मोरे यांची 2017 ची, जात प्रमाणपत्र पडताळणी, समिती कडील दाखल प्रस्तावाची पावती, ग्राह्य होवु
शकत नाही. त्यामुळे सौ .मोरे यांच्या, उमेदवारी अर्जावर घेतलेली हरकत, ग्राहय धरल्या गेली असती, तर केवळ एकच उमेदवारी अर्ज शिल्लक राहल्याने. ही
पोटनिवडणुक बिनविरोध झाली असती. मात्र लोणार निवडणुक, निर्णय अधिकाऱ्यांनी, माझ्या हरकती वर कोणतीही, चौकशी न करता, सौ उज्जवला प्रल्हाद मोरे यांचा, उमेदवारी
अर्ज निवडणुक, आयोगाचे नियम डावलून, खारीज केला नाही.
आणि जर निवडणुक आयोगाच्या
नियमानुसार, सौ. उज्वला प्रल्हाद मोरे, यांचा उमेदवारी अर्ज खारीज केला असता, तर मी
बिनविरोध विजयी झालो असतो. निवडणुकीसाठी मतदारांना निवडूकीला सामोरे जावे लागत नव्हते. आणि निवडणुकी करिता लागणारा पैसा वाचला असता, निवडणुक आयोगाच्या, नियमाचा भंग केल्याने, लोणार निवडणुक निर्णय, अधिकारी यांच्यावर कडक कारवाई, करूण
प्रतिस्पर्धी उमेदवार, सौ उज्जवला प्रल्हाद मोरे यांना अपात्र करून मला, विजयी घोषीत
करण्याबाबतची तक्रार, जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी, तथा जिल्हाधिकारी बुलडाणा, यांच्याकडे सागर पनाड यांनी केली आहे. असे वृत्त जय इंडिया जय भारत प्रतिनिधी सागर झणके यांनी कळविले आहे..
विज पडून एका महिलेचा मृत्यु तर दोन जखमी,नांदुरा तालुक्यातील अलमपूर येथील घटना..

अटैचमेंट क्षेत्र
19 जुलै रोजी दुपारच्या सुमारास बुलडाणा जिल्ह्यातील अलमपूर येथील, शारजाबाई शालिग्राम भगत, वय 65 वर्ष यांच्या अंगावर,
विज पडून त्यांचा मृत्यु झाला. तर त्याच्या शेजारी असलेल्या कमलाबाई, शेषराव मोरे वय 55 वर्ष, तर नितुबाई जीतेंद्र
मोरे वय 35 वर्ष, ह्या जखमी झाल्या.
दुपारच्या सुमारास अचानकपणे, विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. तीनही महीला शेतामध्ये,शेतीची कामे निंदन
करत असतांना, पाऊसापासून बचाव करण्यासासाठी, शेताच्या बांधावरील लिंबाच्या झाडाखाली, असलेल्या छोट्याचा झोपडीचा त्यांनी
आसरा घेतला. ज्या लिंबाच्या झाडाखालील झोपडिचा त्यांनी आसरा घेतला तीच्यावरच काळाने घाला घातला,क्षर्णाधात विज कोसळून शारजाबाई भगत यांचा अंत झाला तर त्याच्या सोबतीला
असलेल्या दोन महिला जखमी झाल्या,जखमी झालेल्या दोनही महिलांना खामगाव येथील सामाण्य रुग्णालयात उपचार करुन घरी
आणण्यात आले आहे. असे वृत्त जयइंडिया जयभारत प्रतिनिधी सागर झणके यांनी कळविले आहे.
Thursday, July 18, 2019
पिंपळवाडी येथे अजिंठावन वीभागा तर्फे, गॅस सिलेंडर वाटप करण्यात आले...
पिंपळवाडी येथे अजिंठावन वनविभागा तर्फे, गॅस सेलंडर वाटप करण्यात आले...
सोयगांव
तालुक्यात पिंपळवाडी गावामधे
अजिंठावन वनविभागा तर्फे .आणुसुचीत जमाती .व.आणुसुचीत जाती तसेच गोरगरीब नागरिकांना वनपरीक्षेत्रपाल अधीकारी एस.पी.मांगदरे यांच्या हस्ते गॅस सिलेंड वाटप करन्यात आले तसेच वृक्ष
लागवड करण्यासाठी वृक्ष रोपे सुद्धा
वाटत करण्यात आली. . या वेळेस .प्रमुख उपस्थिती म्हणून वनपरीक्षेत्रपाल एस.पी मांगदरे, जिल्हा परिषद सदस्य गोपीचंद जाधव, धरमसींग चव्हाण बबलु शेठ .सोयगांव मदन राठोड माजि. सभापती सांडु तडवी, मोहम्मद आरीफ, सरपंच मिराबाई सदाशिवे, वनपाल एस.डी. कुचे. वनरक्षक पी.ए.गवळी, वनरक्षक जे.एन चाथे, अनील लोखंडे फीरोज खाँन, विजय कुल्ली व सर्व गावकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते. ही योजना लाभार्थ्यांन्ना 75%.शासना तर्फे
अनुदान .व 25% लाभार्थ्यांन्ना गॅस सिलेंडर साठी भरना करायचा आहे असे वृत्त तालुका प्रतीनिधी रहिम खान जयइंडिया जयभारत यांनी कळविले आहे
समाजसेवक सुमित पंडित, यांच्या हस्ते जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, कोळी बोडखा येथे, शालेय साहित्य विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले..
पोलिस स्टेशनचे निरक्षक गोरख कराड, खरड साहेब तसेच व सरपंच लक्ष्मण
गायकवाड, सय्यद मुसा, अण्णासाहेब मगरे, गणेश हजारे, संपतचावरे कौसर, शेख अनिस, शेख
शालेय, व्यवस्थापन समिती, अध्यक्ष
जिब्राईल पटेल, संतोष पांढरे, अध्यक्ष रियाज मामू, उपस्थित होते. यावेळी समाजसेवक
सुमित पंडित यांच्यातर्फे, 350 विद्यार्थ्यांना
वही-पेन व खाऊ वाटप करण्यात आले. असे वृत्त जयइंडिया जयभारत शेख जिब्राईल प्रतिनिधीनी कळविले आहे..
बुलडाणा जिल्ह्यातील घटना, कारमध्ये श्वास गुदमरून २ बालकांचा मृत्यू , एक गंभीर ...
जय इंडिया जय भारत न्यूज 18 जुलै jai india jai bharat news
Tuesday, July 16, 2019
महाराष्ट्रात!! बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे सरकार ब.स.पा. आणू शकते...
आंबेडकरवादी पक्ष
अनेक आहेत बाबासाहेबांचे नांव घेऊन, किंवा नाते सांगुन सत्ता प्राप्त होणार नाही, तर विचारधारेवर विस्वास ठेऊन ब.स.पा. काम
करते, त्यामुळे बसपाचे सरकार महाराष्टात येणार फक्त बाबासाहेबांचे विचार घरा घरा
पोहचवा कॅडर ,मिटींग वाढवा व बुथपर्यंंत विचार पोहचवा.असे
प्रतिपादन बसपाचे राष्ट़ीय महासचिव उत्तर प्रदेशचे माजी मंत्री महाराष्ट्र
प्रदेशचे प्रभारी आमदार राम अचल राजभर यांनी बुलडाणा, जिल्हयाच्या वतीने
आयोजीत कार्यकर्ता, प्रशिक्षण शिबीर मध्ये केले. असे वृत्त जयइंडिया जयभारत प्रतिनिधीं सागर झणके यांनी कळविले आहे..
Å
वर्षावास २०१९ निमित्त.... विविध कार्यक्रम
बुलढाणा
जिल्ह्यातील मेहकर, तालुक्यामधील मौजे देऊळगाव माळी, गावांमध्ये विश्वशांती बुद्ध
विहार
बहुउद्देशीय
स्मारक समिती,
बुद्ध टेकडी
देऊळगाव माळी यांच्यावतीने वर्षावास २०१९ विविध कार्यक्रम कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची
सुरुवात, बुद्धाला वंदन करून आणि त्रिशरण पंचशील ग्रहण करून करण्यात आली. यानंतर
बुद्ध विहाराच्या परिसरामध्ये गुरुपौर्णिमा आणि वर्षावास २०१९ अवचीत्त साधून अनेक
वृक्षांचे लागवड करण्यात आली. ते वृक्ष लावायचीच नाही? तर त्याचा संगोपनाचे काम ही सर्वांनी हाती घेतले आहे .गावातील गरीब मुले
जे शिकण्यासाठी इच्छुक आहेत .शहरांमध्ये जाऊ शकत नाही त्यांच्या अभ्यासासाठी राजगृह अभ्यासिका सुरू करण्यात आली. या
कार्यक्रमासाठी मोरे (भा.रि.प. महासंघ), किसन बळी (क्रांतिसूर्य तालीम संघ अध्यक्ष), भास्कर गवई ( सामाजिक कार्यकर्ते), गजेंद्र गवई, पत्रकार राजेश मगर,पत्रकार कैलास राऊत,डॉ. विशाल मगर ,प्रकाश डोंगरे( युवा कार्यकर्ते), रामदास हिवाळे, विजय गवई (ग्रा.प. सदस्य) विलास गवई, सदाशिव गवई,
गणेश गवई संदीप
गाभणे,
अरुण गवई, प्रेम सागर गवई ,गोपाल सरदार ,संतोष मोरे ,सोपान अवसरमोल ,निलेश गवई, सचिन इंगळे ,विशाल इंगळे,बाळू गवई, असे विविध
क्षेत्रातील विविध धर्मातील गावकरी, कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब
आंबेडकर लिखित "बुद्ध आणि त्यांचा धम्म" या ग्रंथाचे पठन रोज रात्री ८:00वाजता सर्व गावकरी श्रवण करतीलच असा अनुभव
विविध मान्यवरांनी सांगितला आहे. विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागावी, यासाठी सर्वच मोठ्या कार्यकर्त्यांनी
पुस्तकाची ग्वाहीही दिली.
निसर्गाचा बिघडलेला
समतोल योग्य जागेवर राहण्यासाठी "झाडे लावा, झाडे जगवा अभियान", विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागावी यासाठी राजगृह अभ्यासिका ,आणि गुरु गुरुपौर्णिमेनिमित्त, ग्रंथाचे पठन
अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन, असे विविध कार्यक्रम करून एक सामाजिक बांधिलकी, जपण्याचे काम विश्वशांती बुद्ध विहार स्मारक समिती, बुद्ध टेकडी देऊळगाव माळी, यांच्या वतीने करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम गवई सर आणि
राहुल गवई यांनी केले.
असे वृत्त जयइंडिया जयभारतचे प्रतिनिधी राहुल गवई यांनी कळविले आहे...
फवारणी करताना घ्यायची काळजी.... कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी
विवेकानंद आश्रम संचलित व डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, संलग्नित
विवेकानंद, कृषि महाविद्यालय,हिवरा बु. येथील
अंतिम वर्षाचे विद्यार्थ्यांनी, ग्रामीण कृषी कार्यनुभव, कार्यक्रमांतर्गत सावंगी, माळी येथे फवारणी कशी करावी, व कोणती काळजी घ्यायची, या संदर्भात प्रात्यक्षिक, आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रगतशील शेतकरी भगवान अवचार, सुनील काळे व इतर शेतकरी उपस्थित होते.
प्रशिक्षणार्थी
विद्यार्थी शुभम पोफळे, याने उपस्थितांना फवारणी कशी करावी, तण तणनाशक हाताळणी, साठवणूक व फवारणी करताना, शेतकर्यांनी काळजी
काशी घ्यायची, ते सांगितले तसेच पिकात फवारणी, करताना एकेरी नोझल, असलेला पंप वापरावा, नेहमी स्वच्छ पाणी वापरावे, गढुळ पाणी अथवा साचलेल्या पाण्यात, फवारणी करू
नये,
हातमोजे, मास्क, टोपी,
प्रान, पुर्ण पँट, गॉगल हे संरक्षण साहीत्य, वापरल्याशिवाय द्रावण तयार करू नये, किटकनाशक शरीराच्या कुठल्याही भागावर पडणार
नाही याची काळजी घ्यावी,
नाक, कान, डोळे व हात फवारणी, होत असलेल्या, औषधापासून संरक्षित राहतील, याची संपूर्ण काळजी घ्यावी, किटकनाशक यांच्या लेबलवरील सुचना समजून
घ्याव्यात,
गरजेनुसार व
गरजे इतकेच द्रावण तयार करावे, दाणेदार प्रकारची औषधे, तशीच वापरावीत, त्यांना पाण्यात विरघळू नये, स्प्रे पंपाची टाकी भरताना औषधे सांडणार नाही याची काळजी घ्यावी, फवारणी संपल्यावर आंघोळ करावी व कपडे स्वच्छ
धुवावे,
फवारणी करताना
खाणे,पिणे, धुम्रपान करणे,
तंबाखू खाणे आदी
प्रकार अजिबात करू नये,
शिफारस केलेल्या
तिव्रतेच्या औषधांचा वापर करावा, अतितीव्रतेची औषधे वापरले म्हणजे किडरोग नियंत्रणात होतो, असे नाही, किंबहुना
त्यायोगे पर्यावरण व पिकांच्या स्वास्थ्यावर परीणाम होवू शकतो.
इतर
प्रशिक्षणार्थी विद्यार्थी हर्षल मंडलिक यांनीही माहिती दिली . प्राचार्य.कालवे सर,कार्यानुभव कार्यक्रम अधिकारी, खोडके सर,जकाते सर, डॉ.भोंडे सर,यांच्या मार्गदर्शनाखाली,शेतकऱ्यांना माहिती दिली. असे वृत्त जयइंडिया जयभारत प्रतिनिधी राहुल गवई, यांनी कळविले आहे...
गुरुपौर्णिमा साजरी...जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुका..
जळगाव जिल्ह्यात पाचोरा तालुका, शहरात चर्मकार उठाव
संघाच्या वतीने, गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. चर्मकार उठाव संघ पाचोरा तर्फे
शहरात गुरुपौर्णिमा निमित्त. विविध
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
चर्मकार उठाव संघाचे, विभागीय उपाध्यक्ष राजू सावंत,यांनी प्रास्ताविक केले. युवक जिल्हाध्यक्ष गंगाराम तेली, यांनी मनोगत व्यक्त करत
शुभेच्छा दिले. बाप्पू महाराज यांनी शाखनंद
करून महाआरती सुरुवात केली. तसेच प्रमुख मान्यवर शिवसेनेचे जितु जैन व भा.ज.पा.चे वीरेंद्र चौधरी, अध्यक्ष गणेश शिंदे, तालुका अध्यक्ष नितीन तायडे, जिल्हा संघटक, संदीप गाडेकर, देवराम आहेरे, विसावे आप्पा, यांच्या हस्ते पाचोरा शहरात, वूक्ष वाटप
करण्यात आले. याप्रसंगी नाना मोरे, दिलीप अहिरे, संपक वानखेडे, भिकन टेलर,
गोपाल मोरे बबलू, मनोज निकम, मधुकर मोची, आकाश मोची,
पाचोरा शहराध्यक्ष संदीप सावकारे, रमेश सावंत अनिल, आयरे शेट्टी, रमेश पवार, उपस्थित होते. गुरुपौर्णिमा निमित्त आलेल्या. बांधवांना फळ वाटप करण्यात
आले. असे वृत्त जयइंडिया जयभारत न्यूज चॅनेल प्रतिनिधी प्रकाश शेवाळे यांनी कळविले आहे..
Sunday, July 14, 2019
सिद्धार्थ महाविद्यालयात वृक्षारोपण.....जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रखमाजी जाधव यांच्या हस्ते...
सिद्धार्थ
महाविद्यालयात वृक्षारोपण
औरंगाबाद :
येथील,
सिध्दार्थ
महाविद्यालयात जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रखमाजी जाधव यांच्या हस्ते
महाविद्यालयाच्या परिसरात विविध प्रकारची वृक्ष लागवड करण्यात आली. शहराच्या
पर्यावरण संरक्षणसाठी व पर्यावरण संतुलनासाठी आजच्या पिढीतील विद्यार्थ्यांनी
भूमिका घेणे गरजेचे आहे.
डॉ.बाबासाहेब
आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे बहिशाल शिक्षण मंडळ व राष्ट्रीय सेवा योजना यांच्या
संयुक्त विद्यमाने आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात जाधव बोलत होते, याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.
बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य, मुपटा शिक्षक संघटनेचे सचिव व माजी नगरसेवक
प्रा. सुनील मगरे होते,
महाविद्यालयाचे
प्राध्यापक डॉ. मिलिंद आठवले, प्रा.शिलवंत गोपणारायन,
प्रा. विनोद
अंभोरे,
राम जाधव, विशाल पठारे व कल्याण नलावडे यांची प्रमुख
उपस्थिती होती.
यावेळी प्रा. सुनील मगरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना
सांगितले की,
भविष्यात
दुष्काळ परिस्थिती निर्माण होणार नाही, याकरिता आजच्या काळातील विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश केल्यावर एक झाड
जगविण्यासाठी व त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी स्वीकारली असता महाविद्यालयाच्या
परिसरासोबतच आजूबाजूला असलेल्या गावाला व आपल्या गावाला सुध्दा ग्रीन कॅम्पस
बनवावा,
अशी अपेक्षा
यावेळी प्रा. मगरे यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे मुख्य आयोजक डॉ.मिलिंद आठवले
यांनी प्रास्ताविक करताना म्हटले की, दुष्काळ नष्ट करण्यासाठी वृक्षारोपण करणे व त्यासाठी संपूर्ण वर्षभर वृक्ष
लागवड करावी व त्याचे महत्त्व सामाजात पोहोचविणे विद्यार्थ्यांचे कर्तव्य व जबाबदारी आहे,प्रा. शिलवंत गोपणारायन यांनी
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वृक्षारोपनाचे महत्व पटवून दिले, प्रा. विनोद अंभोरे यांनी मनोगत व्यक्त केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण प्रधान
यांनी केले,
आभार गौतम चाटसे
यांनी मानले,
कार्यक्रम
यशस्वीतेसाठी अमरदीप हिवाराळे, अमोल भालेराव,
सुनील दाभाडे व
दीपक पाईकराव यांनी प्रयत्न केले. असे वृत्त जयइंडिया जयभारत प्रतिनिधी सागर झणके यांनी कळविले आहे
गुणवंत, विद्यार्थ्यांचा सत्कार....बुलडाणा अर्बन देऊळगाव माळी शाखेच्या वतीने
देऊळगाव माळी
ता. मेहकर येथील, बुलडाणा अर्बन देऊळगाव माळी शाखेच्या वतीने, दरवर्षी प्रमाणे
यंदाही,१०वी आणि १२वी च्या परिक्षेत, यश संपादन करणाऱ्या गुणवंत, विद्यार्थ्यांचा
सत्कार आयोजन करण्यात आले होते.
या
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय व्यवस्थापक श्री. ज्ञानेश्वर देशमाने, मेहकर शाखा व्यवस्थापक श्री.राजेश बगाडे,
संगणक विभागाचे लिपिक श्री. स्वप्नील देशमुख, स्थानिक संचालक श्री. श्रीराम गिर्हे , श्री.गजानन देवकर , श्री. रमन जैन , विधिज्ञ विजय कुलकर्णी , डॉ . आशिष अवस्थी ,
उपप्राचार्य
श्री . मधुकर गाभणे सर ,
तंटामुक्ती
अध्यक्ष श्री . राजेश मगर ,
शाखा व्यवस्थापक
जनार्दन काळे ,
सहाय्यक शाखा
व्यवस्थापक पुरुषोत्तम गिऱ्हे , संजय जाधव सर ,
आप्रे सर , कलोरे सर , पालक वर्ग व इतर कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती . यावेळी इ.१२वी
विज्ञान मधुन प्रथम आलेली समृद्धी आशिष अवस्थी ८५.६९% व दुसऱ्या क्र.जिजाऊ
दत्तात्रय काळे ८१.०८ % तसेच
१२वी कला मधुन प्रथम दुर्गा संजय काळे ८१.६९ व
दुसऱ्या
क्र. सपना
माधवराव उलमाले ७४.९२% तसेच १०वी विज्ञान कु . वैष्णवी रामकिसन वाढे ९४.२०% व
सानिका गजानन मगर
९२.८०% या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
राष्ट्रीय युवा सांसद कार्यक्रम.....विवेकानंद प्रशिक्षण संस्था, मेहकर...
ता.मेहकर जिल्हा बुलढाणा विवेकानंद प्रशिक्षण संस्था, मेहकर येथे राष्ट्रीय युवा सांसद कार्यक्रम यशस्वीरित्या
संपन्न नेहरू युवा केंद्र संघटन
महाराष्ट्र व गोवा राज्य संचालक सौ. ज्योती मोहिते याच्या मार्गदर्शनानुसार, विवेकानंद प्रशिक्षण संस्था
मेहकर येथे दि.१३ जुलै २०१९ रोजी आयोजित करण्यात आला होता. तसेच सदर कार्यक्रमामध्ये
युवा सांस्कृतिक, क्रीडाविषयक ,स्वच्छता ,कौशल्य ,विकास तसेच
स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन इ. विषयावर मार्गदर्शन करण्यात आले होते.असे वृत्त
जयइंडिया जय भारत प्रतिनिधीं राहुल गवई कळविले आहे..
जयइंडिया जय भारत प्रतिनिधीं राहुल गवई कळविले आहे..
Subscribe to:
Posts (Atom)
JAI INDIA JAI BHARAT T.V. LIVE....
तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री श्री चंद्रशेखर राव यांनी, महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीत कामकरणाऱ्या, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
हैदराबाद : महाराष्ट्रातील शेतकरी चळवळी मधे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री श्री चंद्रशेखर राव यांनी...

DEPARTMENTS
- Desh (131)
- Headline (125)
- Maharashtra (116)
- Maharashtra Video (118)
- Video (119)

-
हैदराबाद : महाराष्ट्रातील शेतकरी चळवळी मधे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री श्री चंद्रशेखर राव यांनी...